Economic Development

मराठा समाजाच्या आर्थिक विकासावर लक्ष केंद्रित करण्याची गरज

शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्य शून्यातून निर्मान केले. सर्व जातीतील मराठी मावळे यांनी स्वराज्यासाठी बलिदान आणि त्याग केला होता त्यामुळे मराठी साम्राज्य हिंदुस्थानभर पसरले होते. तो मराठा सध्या आर्थिक संकटात अडकला आहे त्याला जगातील विकसित मराठा समाज करायचे असेल तर पुन्हा एकदा १० ते १५ वर्षासाठी सामूहिक आर्थिक विकास साध्य करणेसाठी नियोजनबद्ध शास्त्रीय पद्धतीने काम करायला हवे आहे.

सगळ्यात प्रथम मराठा समाजाने एकत्र येणे गरजेचे आहे. राजकीय जोडे बाहेर ठेवावे लागतील. स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवावे लागेल. प्रत्येकाकडे देवाने आणि निसर्गाने एक कला आणि वेगळेपण दिले आहे. जे तुमच्याकडे आहे त्यातील काही भाग, वेळ, ज्ञान, अनुभवं, सल्ला, साथ मराठा बांधवानी केल्यास आर्थिक आणि सामाजिक विकास शक्य आहे. पुढील १० ते १५ वर्षे फक्त मराठा समाजास सर्वानी प्राधान्य दिल्यास आर्थिक आणि सामाजिक विकास लवकरात लवकर गाठणे शक्य आहे

भूतकाळात आपल्या मराठी बांधव यांच्या हातून काही चुका झाल्या असतील तरीही त्या विसरून भवीष्यात कशी प्रगती करता येईल याचा विचार करावा लागेल. सरकारी योजना मराठी कुटुंबापर्यंत पोहचवणेसाठी प्रयत्न केला गेला पाहिजे. सरकारी योजना मराठी कुटुंबापर्यंत पोहचवणेसाठी प्रयत्न केला गेला पाहिजे. त्यासाठी कायम स्वरूपी मराठी समाजाच्या गावोगावी शाखा सुरु करून एकसंघ देशपातळीवर संगठन करणे गरजेचे आहे.  

  • प्रत्येक गावाच्या शाखेचा प्रमुख हा तालुका शाखेचा सभासद असेल.
  • प्रत्येक तालुका शाखेचा प्रमुख हा जिल्हा शाखेचा जिल्हा असेल. 
  • जिल्हा शाखेचा प्रमुख हा राज्य स्तरावरील विभागीय कमिटीचा सभासद असेल. आणि
  • सर्व विभागीय प्रमुख हे राज्य कार्यकारिणेचे सभासद राहतील.

महाराष्ट्रातील व अन्य ठिकाणच्या शहरांमध्ये राहणारा मराठा समाज आज इतर प्रगतिशील समाजांसोबत सुयोग्य ‘नेटवर्किंग’ करत वेगाने पुढे जातो आहे. मराठा युवक तंत्रज्ञान-व्यवस्थापन-उद्योजकता-संशोधन इत्यादी क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी शहरांमध्ये करतो आहे. हा मराठा युवक जागतिकीकरणाने प्रदान केलेल्या संधींवर आरूढही होतो आहे. प्रश्न उपस्थित होतो तो खेडे व तालुक्यांमध्ये राहणाऱ्या मराठा समाजाबाबतचा.

आर्थिक विकास म्हणजे काय?

आर्थिक विकास म्हणजे समाजाच्या सर्व घटकांच्या जीवनमानात आर्थिक सुधारणा घडवून आणणे. यात उत्पन्न, रोजगार, गुंतवणूक, उत्पादन, आणि उपभोग यांसारख्या घटकांची वाढ समाविष्ट आहे. आर्थिक विकासामुळे समाजातील सर्व लोकांचे जीवनमान सुधारते आणि त्यांना समृद्धीकडे वाटचाल करण्याची संधी मिळते.

आर्थिक विकासाचे प्रकार

  1. उद्योग विकास: कारखाने, उत्पादन, आणि औद्योगिक क्षेत्रातील विकास.
  2. कृषी विकास: शेती, पशुपालन, आणि कृषी संबंधित उद्योगांचा विकास.
  3. सेवा क्षेत्र विकास: आरोग्य, शिक्षण, पर्यटन, आणि माहिती तंत्रज्ञान यांसारख्या सेवा क्षेत्रांचा विकास.
  4. वित्तीय विकास: बँकिंग, गुंतवणूक, आणि आर्थिक संस्थांचा विकास.

मराठा समाजाच्या आर्थिक विकासाचा इतिहास

मराठा समाजाच्या आर्थिक विकासाचा इतिहास समृद्ध आणि प्रेरणादायक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यात आर्थिक विकासाला महत्त्व दिले होते. त्यांच्या काळात कृषी, व्यापार, आणि उद्योग या क्षेत्रात महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या गेल्या होत्या. शाहू महाराजांनी शिक्षण, कृषी, आणि उद्योग यांसारख्या क्षेत्रांमध्ये प्रगतीसाठी अनेक उपाययोजना केल्या.

मराठा समाजासाठी आर्थिक विकासाचे फायदे

मराठा समाजाच्या आर्थिक विकासामुळे विविध फायदे होऊ शकतात:

  1. उच्च उत्पन्न: आर्थिक विकासामुळे मराठा समाजातील कुटुंबांचे उत्पन्न वाढेल, ज्यामुळे त्यांच्या जीवनातील आर्थिक अडचणी कमी होतील.
  2. रोजगाराच्या संधी: आर्थिक विकासामुळे उद्योग, व्यापार, आणि सेवाक्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी वाढतील, ज्यामुळे बेरोजगारीची समस्या कमी होईल.
  3. शिक्षण आणि कौशल्य विकास: आर्थिक विकासामुळे शिक्षण आणि कौशल्य विकासावर अधिक भर दिला जाईल, ज्यामुळे समाजातील युवकांना चांगल्या नोकऱ्या मिळतील.
  4. उद्यमशीलता: आर्थिक विकासामुळे उद्यमशीलतेला प्रोत्साहन मिळेल, ज्यामुळे समाजातील लोकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळेल.

मराठा समाजाच्या आर्थिक विकासासाठी उपाय

  1. शिक्षण आणि कौशल्य विकास: शिक्षणावर आणि कौशल्य विकासावर अधिक भर देणे आवश्यक आहे. उच्च शिक्षण आणि तांत्रिक शिक्षणामुळे युवकांना चांगल्या नोकऱ्या मिळतील.
  2. उद्यमशीलतेला प्रोत्साहन: समाजातील युवकांना उद्यमशीलतेसाठी प्रोत्साहित करणे आणि त्यांना आवश्यकतेनुसार प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य पुरवणे.
  3. सरकारी योजनांचा लाभ: सरकारच्या विविध आर्थिक योजनांचा लाभ घेण्यासाठी समाजातील लोकांना जागरूक करणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणे.
  4. सहकारी संस्था आणि बचत गट: सहकारी संस्था आणि बचत गट स्थापन करून समाजातील लोकांना आर्थिक स्थैर्य मिळवून देणे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ

प्रसिद्ध माथाडी कामगार नेते मा. अण्णासाहेब पाटील यांच्या नावाने, राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी राज्य शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना दिनांक २७/११/१९९८ रोजी केलेली आहे. महामंडळाच्या योजनेचा लाभ फक्त मराठा समाजातील तरुण/तरुणींना दिला जाईल. यासाठी ज्यांच्या दाखल्यावरती मराठा असा उल्लेख आहे तेच यांस पात्र राहतील. आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे सशक्तीकरण घडवून आणणे असे महामंडळाचे ध्येय आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत या महामंडळाच्या योजनांची अंमलबजावणी होते

उद्दीष्टे :-

  • आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकापर्यंत विशेषकरून बेरोजगार तरुणांनपर्यत पोहचून त्यांना सक्षम बनविणे.
  • योजना राबवून रोजगाराच्या व स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
  • आर्थिकदृष्ट्या मागासघटकांचा सामाजिक विकास घडवून आणणे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ – ऑनलाईन वेब पोर्टल 

महाराष्ट्र शासनाच्या ई-प्रशासन धोरणास अनुसरून दि. २१ जुलै २०१४ पासून लाभार्थ्यांना स्वयंरोजगाराच्या योजना राबवण्याची प्रक्रिया जलद, पारदर्शी आणि अधिक कार्यक्षम करण्यासठी ऑनलाईन वेब पोर्टल विकसित करण्यात आले आहे. प्रस्तुत वेब पोर्टलवर कर्ज अर्ज ऑनलाईन भरणे, स्थळ पाहणीचा दिनांक निश्चित करणे, अर्जाची सद्यस्थिती तपासणे तसेच अर्जासाठी आवश्यक कागदपत्राचे नमुने व तत्सम माहिती उमेदवाराला एका क्लिक वर उपलब्ध करून देण्यात आली आहे. वेब पोर्टलवर असलेल्या माहितीचा योग्य अभ्यास करून कर्जासाठी अर्ज केल्यास स्वयंरोजगारासाठी कर्ज देण्याची प्रक्रिया विहित मूदतीत पूर्ण होईल 

निष्कर्ष

मराठा समाजाच्या आर्थिक विकासावर लक्ष केंद्रित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आर्थिक विकासामुळे समाजातील सर्व लोकांचे जीवनमान सुधारेल आणि त्यांना समृद्धीकडे वाटचाल करण्याची संधी मिळेल. शिक्षण, रोजगार, उद्यमशीलता, आणि सरकारी योजनांचा लाभ घेऊन मराठा समाज आर्थिक स्थैर्य मिळवू शकतो. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन आर्थिक विकासासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, ज्यामुळे मराठा समाजाची आर्थिक स्थिती सुधारेल आणि ते समृद्धीकडे वाटचाल करतील.

काळानुसार जे समाज वैश्विक/जागतिक मापदंडांवर खरे उतरतात व खरे उतरण्यासाठी जी बदलाची प्रक्रिया सर्वंकषपणे, अव्याहतपणे राबवतात, तेच समाज वैश्विक/जागतिक नेतृत्व देऊ शकतात. अस्तित्वात असलेल्या बलस्थानांचे पुनर्नियोजन व नव्या बलस्थानांची प्राप्ती करणे असा दुहेरी प्रयत्न प्रत्येक प्रभावशाली समाजाला करावा लागतो. वास्तव ‘ज्ञानाधिष्ठित वैश्विकीकरणा’ला सामोरे जावे लागते.

खेडे-तालुक्यांमधील  वसाहतींचे टिकाऊ नियोजन

खेडे-तालुक्यांमधील मराठा समाजात ज्ञानाधिष्ठित गोष्टींना, परंपरा – संबंधांना महत्त्व प्राप्त झाले पाहिजे. याबाबतीत ज्ञानाचा प्रसार करण्याची जबाबदारी शहरातील मराठा युवक करू शकतील.  खेडे-तालुक्यांमधील एकूणच वसाहतींचे – पर्यावरणाचे ‘टिकाऊ नियोजन’ इथे अभिप्रेत आहे. इंग्रजी भाषेचा बागुलबुवा बाजूला ठेवून आणि दिखाऊगिरी करणा-या शहरी पंडितांना टाळून ‘मराठी’ भाषेत हे जीवनोपयोगी ज्ञान संगणकांद्वारे प्रत्येक खेड्यात पोहोचवता येईल.  अंगभूत नेतृत्वगुण असलेला मराठा युवक ‘ज्ञानाच्या प्रक्रियांचे नेतृत्व’ करायला सरसावला पाहिजे.

मोठ्या सहकारी शेती

भाऊबंदकी, शहराकडील ओढा, गचाळ होत जाणारे राजकारण आणि पुस्तकी डिग्‍य्रांमुळे बहुतांश भागांमध्ये शेतीचे व्यवस्थापन नीट होत नाहीय. आता तातडीची गरज आहे ती ‘मोठ्या सहकारी शेती’ची. यासाठी अहंकार, अविश्वास व राजकीय आश्वासनांना बाजूला ठेवून मराठा युवकांनी ‘समानता-समग्रता-समकालीनता’ या त्रयीवर आधारित शेतीसाठीचा पुढाकार घ्यायला हवा. ‘फोडा आणि राज्य करा’चे जुने तंत्र पुन:पुन्हा वापरणारे अशा शेतकी प्रयोगांच्या आड येऊ शकतात. ज्ञानाधिष्ठित मार्गक्रमण करण्याचे ठरवल्यावर असे अडथळे दूर सारण्याची सम्यक दृष्टी मराठा युवकांकडे येऊ शकते

‘शेतकी संशोधन – बियाणांची निर्मिती

‘शेतकी संशोधन – बियाणांची निर्मिती व वाटप-आधुनिक पेरणी, फवारणी-सिंचन-विमा-पीककापणी-साठवण-विक्री’ अशी संपूर्ण साखळी दलालांना बाजूला ठेवून राबवता आली पाहिजे. इथे पुन्हा ‘समानता-सहकार्या’ची भावना आणि व्यवस्थापनासाठी बुद्धिप्रामाण्यवाद वापरावयास हवा. उपरोक्त घटकांपैकी शेती नियोजनाचा – व्यवस्थापनाचा घटक मराठा समाजाला पूर्वीचे आर्थिक वैभव पुन्हा मिळवून देऊ शकतो.  

ज्ञानाच्या व्यवस्थापना’त मराठा युवतींनी-मातांनी मोठा सहभाग घ्यायला हवा.

शहाजीराजेंच्या अनुपस्थितीत शिवबाला क्षात्रतेज-ज्ञानतेज देणारी जिजाऊ माता आता मराठा समाजाच्या ‘महिला शक्ती’चे दृश्य व कार्यकारी असे प्रेरणास्थान व्हायला हवे. यासाठी पुन्हा ‘ज्ञानाच्या व्यवस्थापना’त मराठा युवतींनी-मातांनी मोठा सहभाग घ्यायला हवा.

अस्मिता जोपासण्याच्या प्रक्रियांवर किती वेळ व वित्त खर्च करावा, यासंबंधीचे धोरणात्मक निर्णय आता मराठा महिलांनी घ्यायला सुरुवात करावी. ‘राज्यकर्त्यांच्या अस्मिते’पेक्षा आर्थिक-शैक्षणिक सुदृढता अधिक महत्त्वाची आहे हे मातांनी आपल्या मुलांना सांगावयास हवे.

ज्या समाजाकडे अशी सुदृढता असते, तो समाज आपोआपच वैश्विक नेतृत्व देण्यासाठी पुढे सरसावू शकतो. मराठा समाजातील एकूण बदलाची मांडणी पुढे नेण्यात महिलांचा सहभाग पुरुषांपेक्षा काकणभर अधिकच असायला हवा.

इतर समाजघटकांसोबत ‘सहकार्याचे-प्रगती’चे जोरदार ‘नेटवर्किंग’

इतर समाजघटकांसोबत आता मराठा समाजाने ‘सहकार्याचे-प्रगती’चे जोरदार ‘नेटवर्किंग’ करावयास हवे. असे नेटवर्किंग सत्तास्थानी राहण्यासाठी मराठा राजकारणी नेहमीच करतात. हे ‘नेटवर्किंग’ आता मराठा युवकांनी व्यावहारिक पातळीवर स्वत:च्या उत्थापनासाठी केले पाहिजे.

मारवाड्यांची व्यवहारकुशलता, पंजाब्यांची विक्रीतील कल्पकता, सिंध्यांची चिकाटी, शेट्टींची सामूहिक उद्योजकता, तामिळ-केरळी बांधवांची भौगोलिक लवचीकता इ. अनेक गोष्टी या नेटवर्किंगमधून साध्य होऊ शकतील. 

बारा बलुतेदारांच्या जुन्या नेटवर्कला “सामूहिक उद्योजकता” आता मराठ्यांनी आधुनिक रूप द्यावयास हवे. आजच्या वैश्विकीकरणाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रत्येक समाजाने असे ‘बहिर्मुख’ व्हायलाच हवे. 

जागतिकीकरणाच्या नव्या रचनेत ‘राजकारणी शक्तीं’चा उपयोग क्षीण

जागतिकीकरणाच्या नव्या रचनेत ‘राजकारणी शक्तीं’चा उपयोग क्षीण होत चाललाय. शहरातल्या मराठा तरुणांनी हे वेळीच ओळखले आहे. ही जाण आता खेड्यांमध्ये पोहोचायला हवी.

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांच्या या चारही अंगांना सुदृढ केले होते म्हणून स्वराज्य उभे राहिले. आजचा मराठा समाज या चारही अंगांची ‘अंगभूत शक्ती’ धारण करणारा आहे. गरज आहे ती या चारही अंगांच्या सामायिक दृढीकरणाची व सबलीकरणाची. मराठा समाज जेवढा ज्ञानाधिष्ठित वैश्विकीकरणाला सामोरा जाईल तेवढे वैश्विक नेतृत्व तो उद्या देऊ शकेल. यामुळे महाराष्ट्राला तर गतवैभव प्राप्त होईलच; पण देशाचेही त्यामुळे भले होईल. ‘शिवरायांचा आठवावा प्रताप’ या सर्वप्रिय सुभाषितावर आता समग्रपणे – वेगाने कार्य व्हावयास हवे!