Home

"एक मराठा, कोटी मराठा"

सध्याची परिस्थिती पाहता आणि सरकारची धोरणे पाहता मराठा जातीचा सामाजिक आणि आर्थिक विकास ठप्प झाला आहे. जर मराठा समाजाचा सामाजिक आणि आर्थिक विकास करायचा असेल तर सर्वानी एकत्र येऊन नियोजनबद्ध कार्यक्रम निश्चित करून कार्य करणे आवश्यक झाले आहे. आपला उद्देश येत्या दहा ते पंधरा वर्षांत सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मराठा समाजाचा विकास करणे आहे. जगातील सर्वात जास्त सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या विकसित जात म्हणून, मराठा जातीस निर्माण करणे हे राहील.

आपल्या मराठा समाजाचा सामाजिक आणि आर्थिक विकास करायचा असेल तर प्रथम मुलांचे शिक्षण, आरोग्य सेवा आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यावर समाजाने लक्ष केंद्रित करावे लागेल.

सध्या मराठा समाज आर्थिक निकषयानुसार तीन प्रकारात मोडतो
१) आर्थिकअविकसित (गरीब वर्ग)
२) आर्थिक विकसनशील (मध्यम वर्ग),
३) आर्थिक विकसित (श्रीमंत वर्ग).

मराठा जातीच्या मुलांचे शिक्षण

सामाजिक आणि आर्थिक विकासाचा पाया हा मराठा जातीच्या मुलांचे शिक्षण आणि आरोग्य सेवा यांना प्राथमिकता राहील. त्यामुळे मराठा जातीतील आर्थिक अविकसित (गरीब) कुटुंबातील सर्व मुलांच्या शिक्षणासाठी या मराठा समाजाकडून मोफत आर्थिक साहाय्य करावे लागेल. तर मराठा समाजाच्या विकसनशील (मध्यम वर्ग) सर्व कुटुंबांतील मुलांना शिक्षणासाठी गरज भासल्यास बिना व्याज शैक्षणिक कर्ज द्यावे लागेल. मराठा कुटुंबातील मुलांना स्पर्धा परीक्षा, व्यावसायिक शिक्षण आणि परदेशी शिक्षण घेणेसाठी मोफत सहाय्य करावे लागेल. नोकरीच्या संधी आणि माहिती मराठा मुलांना मोफत देणेसाठी व्यवस्था करावी लागेल.

मराठा जातीच्या मुलांचे इंग्रजी माध्यमातून शिक्षण

भारतातील सध्याची स्थिती पाहता सर्व शासकीय कामकाज, न्यायालयीन कामकाज आणि उच्च शिक्षण हे इंग्रजी मधून आहे. त्यामुळे आपल्या मराठी समाजातील मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणे आवश्यक आहे. तुमच्या आर्थिक विकासाचा पाया हे इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणे आहे. ज्यांनी इंग्रजी माध्यमातून शिक्षण  घेतले नाही त्यांना भविष्यात अनेक संकटाना सामोरे जावे लागते. सर्व काही येत असते परंतु इंग्रजीवर प्रभुत्व नसलेने/इंग्रजी बोलता येत नसलेने अनेक संधी हुकल्या जातात आणि मराठी मुलांचा आत्मविश्वास ढासळतो. काही लोक तुम्ही मागास राहावेत म्हणून मराठीतून शिक्षण घेण्यास सांगतात परंतु आपली मुले इंग्रजी शाळेत आणि परदेशात शिक्षण घेणेसाठी पाठवतात हे सत्य आहे.

आपली मुले बारावी नंतर इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतात. डॉक्टर, इंजिनिअरिंग, वकिली (LL.B.), चार्टर्ड अकाउंटंट (सी.ए.) , कंपनी सेक्रेटरी (सी. एस.), कॉस्ट अकाउंटंट, आर्किटेक्ट साठी इंग्रजीतून शिक्षण घेताना कोणी आक्षेप घेतल्याचे आठवत नाही. मग प्राथमिक शिक्षणासाठी का आक्षेप असतो माहित नाही. 

मराठा समाजासाठी आरोग्य सुविधा

अविकसित (गरीब) कुटुंबातील सर्व सदस्यांना मोफत आरोग्य सेवा (रुग्णालये) प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. त्यासाठी शासनाच्या आरोग्य आणि हॉस्पिटल उभारणीसाठी योजना आहेत, (४०% अनुदान).  काही आपल्या समाजाच्या सामाजिक आणि औद्योगिक संस्था आहेत आणि आपल्या मराठा समाजातील डॉक्टर आणि या क्षेत्रातील व्यक्ती यांनी पुढाकार घेऊन मराठा समाजासाठी आरोग्य सुविधा कश्या पुरवल्या जातील या बाबत पुढाकार घ्यायला हवा.

सर्व मराठा समाज मधील मध्यम आणि श्रीमंत वर्गातील व्यक्तींनी अशी आरोग्य सुविधा उभारणीसाठी ज्यांना शक्य आहे ते देणगी स्वरूपात आणि शेअर्स रुपी भांडवल (Capital) उभारणी करणायास सहभागी होतील. त्यामुळे मराठा समाजासाठी उच्च दर्जाची आरोग्य सेवा गरिबांना मोफत आणि इतरांना अल्प दारात उपलब्ध होऊ शकते.

मराठा समाजातील मुलांचेसाठी उद्योग उभारणीसाठी आणि रोजगार निर्मितीसाठी साहाय्य करणे

आम्ही सामूहिकपणे अनेक व्यवसाय सुरू करू आणि मराठा समुदायाला नोकऱ्या उपलब्ध करून देऊ. मराठा समुदायाच्या व्यवसायांमधून मिळणारा नफा शिक्षण आणि वैद्यकीय खर्चासाठी वापरला जाईल. आम्ही दुग्ध व्यवसाय, आधुनिक शेती, विपणन आणि मराठा समाजासाठी निर्यात सुविधा सुरू करू. हे ध्येय ठेऊन एकत्र येउया आणि आपल्या जातीचा विकास करूया.