कुणबी (मराठा) जात प्रमाणपत्र कसं काढायचं?

Kunbi Caste Certificate : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा गरम आहे. Maratha Reservation या मागणीसाठी सध्या राज्यभर आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचे खरे शिल्पकार आहेत मनोज जरांगे पाटील. मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळावे, मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र मिळावे या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आग्रही आहेत.

कुणबी (मराठा) जात प्रमाणपत्र मिळवणे हे एक महत्त्वपूर्ण आणि आवश्यक काम आहे, विशेषतः सरकारी योजना, शैक्षणिक सवलती आणि नोकरीच्या संधींमध्ये आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी. या प्रक्रियेमध्ये काही ठराविक पावलं पाळावी लागतात. खालील मार्गदर्शिकेतून आपण कुणबी (मराठा) जात प्रमाणपत्र काढण्याची प्रक्रिया जाणून घेऊया.

कुणबी जात प्रमाणपत्र काढण्याची प्रोसेस देखील इतर समाजाचे जात प्रमाणपत्र काढण्यासारखीच आहे. यासाठी तहसील कार्यालयात अर्ज करावा लागतो. खाली नमूद केलेल्या बारा पुराव्यांमध्ये जर कुणबी अशी नोंद असेल तर संबंधित व्यक्ती या पुराव्यानिशी त्यांच्या तहसील कार्यालयात अर्ज सादर करू शकतात.तहसील कार्यालयात अर्ज सादर झाल्यानंतर सदर अर्जाची पडताळणी प्रांत अधिकारी यांच्या माध्यमातून केली जाते. यानंतर मग प्रांत अधिकारी यांच्या सहीने कास्ट सर्टिफिकेट संबंधित व्यक्तीला दिले जाते.

कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी शासनाने स्थापित केलेल्या शिंदे समितीने सांगितलेले 12 पुरावे

  1. महसुली दस्तऐवज : खासरा पत्रक, नागरिकांचे राष्ट्रीय रजिस्टर सन 1951, पाहणी पत्रक, नमुना नंबर एक हक्क नोंद पत्रक, क पत्रक, नमुना नंबर दोन हक्क नोंद पत्रक, कुळ नोंदवही, सातबारा उतारा यांसारख्या महत्त्वाच्या नोंदीमध्ये कुणबी असा उल्लेख असेल तर कुणबी जात प्रमाणपत्रासाठी हा पुरावा ग्राह्य धरला जाईल.
  2. जन्म व मृत्यू रजिस्टर : रक्त संबंधातील नातेवाईकांचा जन्म व मृत्यू झालेल्या गावातील संबंधित तहसीलमध्ये अर्ज करून त्याच्या नावाच्या गाव नमुना नंबर 14 किंवा कोतवाल बुक नक्कल मध्ये जर कुणबी असा उल्लेख असेल तर हा पुरावा देखील कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी उपयोगी येणार आहे.
  3. शैक्षणिक दस्तऐवज : रक्त संबंधामधील नातेवाईकाचा प्राथमिक शाळा प्रवेश निर्गम उतारा किंवा शाळा सोडल्याच्या दाखल्यात जर कुणबी असा उल्लेख असेल तर हा पुरावा देखील कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी उपयोगी येणार आहे.
  4. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडील दस्तऐवज : अनुज्ञप्ती नोंदवही, मळी नोंदवही, ताडी नोंदवही, आस्थापना अभिलेख यामध्ये जर कुणबी असा उल्लेख असेल तर हा देखील पुरावा प्रमाणपत्र काढण्यासाठी ग्राह्य धरला जाणार आहे.
  5. कारागृह विभागाचे दस्तऐवज : रजिस्टर ऑफ अंडर ट्रायल प्रिजनर, कच्च्या कैद्यांची नोंदवही यामध्ये जर कुणबी असा उल्लेख असेल तर हे दस्तऐवज देखील प्रमाणपत्र काढण्यासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.
  6. पोलीस विभागाचे दस्तऐवज : गाववारी, गोपनीय रजिस्टर सी एक आणि सी दोन, क्राइम रजिस्टर, अटक पंचनामे आणि एफ आय आर रजिस्टर यामध्ये जर नोंद असेल तर हे पुरावे देखील कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी ग्राह्य धरले जातील.
  7. सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडील दस्तऐवज : खरेदीखत नोंदणी रजिस्टर, डे बुक, करारखत, साठेखत, इसार पावती, भाडे चिट्ठी, ठोकपत्रक, बटाई पत्रक, दत्तक विधान पत्रक, मृत्युपत्रक, इच्छापत्रक, तडजोड पत्रक तसेच या विभागातील इतरही अन्य जे महत्त्वाचे दस्तऐवज आहेत त्यामध्ये जर नोंद असेल तर हे पुरावे देखील कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी वैध घरातील.
  8. भूमी अभिलेख विभागाकडील महत्त्वाचे दस्तऐवज – पक्का बुक, शेतवार पत्रक, वसुली बाकी, उल्ला प्रति बुक, रिविजन प्रतिबुक, क्लासर रजिस्टर व हक्क नोंदणी पत्रक यामध्ये जर नोंद असेल तर हा पुरावा देखील यासाठी ग्राह्य धरला जाणार आहे.
  9. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्याकडील दस्तऐवज : माजी सैनिकांच्या नोंदीमध्ये कुणबी नोंद आढळल्यास हा पुरावा देखील हे प्रमाणपत्र काढण्यासाठी उपयोगी ग्राह्य धरले जाणार आहे.
  10. जिल्हा वक्फ अधिकारी : यांच्याकडील मुंतखब या कागदपत्रात जर कुणबी नोंद असेल तर हा देखील महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे.
  11. शासकीय कर्मचाऱ्यांचा सेवा तपशील रेकॉर्ड : यामध्ये रक्त संबंधातील नातेवाईक शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत असल्यास सर्विस बुकच्या पहिल्या पानावर संबंधित कार्यालयाने त्या नातेवाईकांची कुणबी जात नोंद केलेली असेल तर हा पुरावा देखील कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी ग्राह्य धरला जाणार आहे. परंतु हे रेकॉर्ड 1967 पूर्वीचे असणे या ठिकाणी आवश्यक राहणार आहे.
  12. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडील दस्तऐवज : जर रक्तसंबंधांमधील नातेवाईकाचे आधीच कुणबी जात प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट असेल आणि कास्ट व्हॅलिडीटी सर्टिफिकेट असेल तर हा पुरावा देखील कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी ग्राह्य धरला जाणार आहे.

महसूल, ग्रामपंचायत, शिक्षण, पोलिस अशा सर्वच शासकीय विभागाकडील १९६७ पूर्वीच्या कुणबी नोंदी तपासणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत पाच कोटींपर्यंत दस्ताऐवज तपासून झाले असून त्यात चार लाखांवर नोंदी आढळल्या आहेत. वंशावळ जुळलेल्या अर्जदाराने कागदपत्रांसह तहसीलदारांकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर केल्यानंतर संबंधिताला ४५ दिवसांत जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही देखील सुरु आहे.

१. आवश्यक कागदपत्रं तयार ठेवा:

प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी, खालील कागदपत्रं तयार ठेवा:

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • रेशनकार्ड
  • जन्म-मृत्यू नोंदीचा १९६७ पूर्वीचा पुरावा
  • अर्जदाराचा रहिवासी प्रमाणपत्र /  दाखला
  • पॅन कार्ड (जर असेल तर)
  • शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • पालकांचे (कुटुंबातील व्यक्तीचे) जातीचे प्रमाणपत्र /जात वैधता प्रमाणपत्र (जर असेल तर)
  • साक्षांकित होण्यासाठी दोन शाळा ओळखपत्र
  • वंशावळ (वडिल, आजोबा, पणजोबा) काढून त्याची पुराव्यानिशी जुळवावी लागणार.

अर्ज कोठे करावा ?

अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन करता येतो.

  • दाखला किती दिवसात मिळतो…..
  • सेतू बंद असल्याने महा-ई-सेवा केंद्रातून तहसीलदारांकडे करावा अर्ज
  • अर्ज केल्यानंतर ४५ दिवसांत दाखला देणे बंधनकारक
  • अर्ज करताना जात प्रमाणपत्रासाठी द्यावे लागेल ५३ रुपयांचे शासकीय शुल्क
  • अर्जातील त्रुटींची माहिती अर्जदाराला मोबाईलवर समजणार

२. ऑनलाइन अर्ज भरा:

महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन जात प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज भरा:

  1. Aaple Sarkar वेबसाइट वर जा.
  2. तुमच्या प्रोफाइलसाठी नोंदणी करा किंवा लॉगिन करा.
  3. ‘Certificate’ विभागात जा आणि ‘Caste Certificate’ निवडा.
  4. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रं अपलोड करा.

४. शाळेतील शैक्षणिक रिकॉर्ड्स:

काही वेळा, अधिकाऱ्यांना शाळेतील शैक्षणिक रिकॉर्ड्सची गरज भासू शकते. त्यासाठी तुमच्या शाळेचे मुख्याध्यापक किंवा वरिष्ठ शिक्षकांच्या सह्या आवश्यक असू शकतात.

३. अर्जाची पडताळणी:

ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर, तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाईल. अधिकारी तुमच्या कागदपत्रांची तपासणी करतील आणि पुढील प्रक्रिया सुरू करतील.

५. तलाठी किंवा तहसीलदार कार्यालयात भेट द्या:

काही वेळा, तुम्हाला तलाठी किंवा तहसीलदार कार्यालयात प्रत्यक्ष भेट देणे आवश्यक असते. तिथे अधिकारी तुमच्या अर्जाची पुनःतपासणी करतील आणि अधिक माहिती घेतील.

७. जात प्रमाणपत्राची सत्यता:

जात प्रमाणपत्र मिळाल्यानंतर, त्याची सत्यता तपासून पहा. काही चुका आढळल्यास, लगेचच संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधा आणि दुरुस्तीची विनंती करा.

६. प्रमाणपत्र प्राप्त करा:

सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला कुणबी (मराठा) जात प्रमाणपत्र दिले जाईल. हे प्रमाणपत्र तुमच्या नोंदणी केलेल्या खात्यात अपलोड केले जाईल किंवा तुमच्या पत्त्यावर पोस्टाद्वारे पाठवले जाईल.

निष्कर्ष

कुणबी (मराठा) जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी या पद्धतीचे पालन केल्यास तुम्हाला सहजतेने आणि नियमीत प्रक्रियेतून प्रमाणपत्र मिळू शकेल. ही प्रक्रिया वेळखाऊ असली तरी, आवश्यक कागदपत्रं आणि माहिती तयार ठेवल्यास, ती सोपी होऊ शकते. जात प्रमाणपत्र मिळवून, तुम्ही सरकारी योजना आणि सवलतींचा लाभ घेऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *